डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का !

PSX_20160506_143315

3 एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या जातीअंत परिषदेत अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी  आरएसएस ला जाहीर आव्हान दिले होते. जातीअंत परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे संघाचा जळफळाट झाला होता. त्यामुळे काही दिवसांच्या आधी संघ समर्थक असलेल्या रमेश पतंगे यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध दैनिक दिव्यमराठी मध्ये  ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ हा लेख लिहून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. पतंगेंच्या या लेखाला प्रत्युत्तर म्हणून मा.प्रवीण जाधव यांनि प्रतिउत्तर म्हणून लिहिलेला लेख दैनिक दिव्यमराठी मध्ये २९ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आला होता. रमेश पतंगे यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लिहिलेला लेख दैनिक दिव्यमराठीच्या प्रत्येक आवृत्ती मध्ये छापण्यात आला होता पण प्रतिउत्तर म्हणून प्रवीण जाधव यांनि लिहिलेला लेख प्रकाशित करतांना दैनिक दिव्यमराठी ने लबाडी केली. प्रवीण जाधव यांचा लेख दैनिक दिव्यमराठीच्या अकोला आवृत्तीमधेच छापण्यात आला होता आणि त्यातही त्या लेखातील महत्वाचा मजकूर काटछाट करून वगळण्यात आला होता.
प्रवीण जाधव यांनी लिहिलेला तो मूळ लेख कुठल्याही प्रकारची काटछाट न करता सर्वांना वाचता यावा यासाठी इथे देत आहोत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का !
रमेश पतंगे हे जेष्ठ राजकिय विष्लेशक आहेत, त्याचबरोबर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत, याबद्दल माझे दुमत नाही. पतंगे यांनी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण टीका केली पाहीजे असे आपल्या लेखातून म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर याठिकाणी घेतलेल्या जातीअंत परिषदेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अर्थात आर.एस.एस.ला एक आव्हान उभे केले आहे. त्याचे चटके सध्या आर.एस.एस. किंवा आर.एस.एस. प्रचारक रमेश पतंगे यांना बसायला लागले आहेत. त्या चटक्यांना विचारांनी उत्तर देण्याऐवजी ते भलतीकडेच हात घालत आहेत. जणुकाही विद्वत्तेचा ठेका घेतल्याच्या अविर्भावात रमेश पतंगे वावरतांना दिसतात. अशाना कधी खरं लिहीता किंवा बोलता आलेल नाही. उसणं आव आणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आम्हीच खुप आत्मसात केलंय, आणि आम्हीच खुप विद्ववान असल्यासारखं दाखवत आहेत. परंतु पतंगेनी यांनी जर पन्नास (५०) सालची आर.एस.एस.ची बाबासाहेबांबद्दलची भाषा वक्तव्ये बघितली तर अधिक चांगले होईल. कारण याच आर.एस.एस.अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी डॉ.बाबासाहेबांना हिंदूचे मारकरी म्हणुन संबोधलेलं आहे. ही त्यांची भाषा, वाक्य जर पतंगेंना कुठ सापडत नसतील तर त्यांच्याच वाक्यांची माहिती मी त्यांना देऊ शकतो. बाबासाहेब फक्त आर.एस.एस किंवा रमेश पतंगे यांनाच कळाले आहेत, इतरांना ते कळालेच नाहीत अशा समजेतुन त्यांनी हा लेख लिहीला आहे. पुढे ते असही लिहीतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जातीविना संघ आहे. परंतु त्यांना एक लक्षात आणून देऊ इच्छितो की मी लहानपणापासुन भिक्कू विधाते भटक्या विमुक्तातले हे नाव आर.एस.एस मध्ये आदराने वापरलेले ऐकलं. परंतु मला हे आजवर कळलेलं नाही की एवढया आदराने वापरले जाणारे भिक्कु विधाते हे नाव आर.एस.एस च्या प्रांतमंडळाचे साध सदस्य का होऊ शकले नाही. याचे कारण समजेल का ?

गोळवलकरांच We the Nation and Nation Hood हे बहुजन हिंन्दुनां समजलेलं नाही. त्यातल्या त्यात ओ.बी.सी. हिंदूंना तर नाहीच. आर.एस.एस. यांनी बहुजन हिंदु आणि ओ.बी.सी. हिंदु यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी  मुसलमान द्वेष उभा करून मुसलमानांना धडा शिकवण्यासाठी सर्व हिंदू एकत्र यावे हिच भूमिका घेतली. आर.एस.एस ला भटके विमुक्तांने 1857 च्या स्वातंत्र युध्दामध्ये केलेले योगदान याची जाणीन नाही. हे बंड मोडण्यासाठी ब्रिटीशांनी Criminal Tribe Act लागु करून भटक्या विमुक्तांना बंदीस्त केले आणि स्वातंत्र्याचा लढा मोडून काढला.याच कारणास्तव भिक्कु विधाते संघाच्या प्रांत मंडळात दिसत नाही. तथा संघामध्ये वैदिक ब्राम्हणांना सोडून कुणालाच मान सन्मान नसतो हेच सत्य आहे.
    संघाचे प्रचारक पतंगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचन करावे व अभ्यासपुर्ण बोलावे असा सल्ला या लेखामध्ये प्रकाश आंबेडकरांना दिला आहे, मुळात नागपुरमध्ये झालेलं भाषण पतगेंनी बारकाईन ऐकलं किंवा वाचलेलं दिसत नाही. जर त्यांनी जे बारकाईने ऐकलं किंवा वाचलं असत तर त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले विचार हे डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना धरूनच आहे. प्रकाश आंबेडकरानी मांडलेलं विचार हे बाबासाहेबांच्या विचारांना धरून नाही, असे पतंगेंना वाटत असेल तर मग त्यांना भाषणातील विसंगती त्यांच्या लेखात त्यांनी दाखवून द्यायला हवी होती. जर पतंगे हे स्वतःला खुप विद्वान समजत असतील तर त्यांना आव्हान आहे की, त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर हे दाखवून द्यावे की प्रकाश आंबेडकरांनी मांडलेले विचारातला कुठला भाग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धरून नाही. जर त्यांना हे स्पष्ट मांडता येत नसेल तर त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावे की, प्रकाश आंबेडकरांचे भाषण तथा विचार हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला एक आव्हान आहे. एवढेच काय पण त्या लेखामध्ये लिहितांना पतंगे यांनी असेही म्हटले आहे की प्रकाश आंबेडकर निवडुन आले नाहीत, परंतु त्यांना हे कळतं की, निवडणुकीचं मापदंड हे कुणाच्या लोकप्रियतेच किंवा कार्याचं मुल्यमापन ठरत नाही. जर असे असेल तर मग डॉ.बाबासाहेब आंबेडकरही निवडणुकीतुन हरले. त्यांच्या हारण्याचे कारण की 1952 च्या लोकसभा निवडणुकित कॉ.डांगे व आर.एस.एस. यांची युती झाली, (सर्व कम्युनिस्ट पक्षाची झाली नाही).
    रमेश पतंगे, हिम्मत असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी काश्मीरसंदर्भात मांडलेली भुमिका स्वतःच्या तोंडुन जाहीर करा व त्या भुमिकेला आर.एस.एस. ने विरोध का केला हे सांगावे, आणि त्यापुढे जावुन हे ही सांगावे की आज काश्मीरच्या संदर्भात आर.एस.एस.ची काय भुमिका आहे! सत्ता आली की आम्ही लगेच 370 हे कलम रद्द करून असं म्हणत मोठया तोर्यात मिरवत होतात. आज सत्ता येऊन ही अडीच वर्षे  झालीत , मग आता तो तोरा कोणत्या टोपीमध्ये शिरलाय हे अजूनही कळलेल नाही.
  आर.एस.एस. धार्मिक प्रश्न उभे करून, छळ करणे, हा तुमचा खेळ आहे. 1984 च्या निवडणुकीत इंदिरा गांधीच्या लाटेमध्ये प्रकाश आंबेडकर निवडणूक जिंकतील या भीतीने आर.एस.एस प्रणित भाजपाने कॉग्रससोबत अभद्र युती केली. एवढं सारं करूनही प्रकाश आंबेडकर निवडणुकीतून पडत नाही हे लक्षात आल्यावर विरोधात घोषणाही द्यायला सुरूवात केली. ‘‘दलित मुस्लीम भाई-भाई, हिंन्दु कौम कहा से आई’’ हे पाप तुमचंच, एवढयावरच न थांबता पुढे असाही खोटा प्रचार केलात की, जर प्रकाश  आंबेडकर निवडून आले तर शेगावचे गजानन मंदीर हे मस्जीद बनवुन टाकतील. तेही करून पडत नाहीत म्हणून प्रमिलाताई टोपलेंच्या मदतीने सगळी मते कॉग्रसकडे वळविलीत. 1984 साली झालेली तुमची युती आजही कायम आहे. कॉग्रेसकडून त्यावेळी ठरवून घेतलेला शब्द आजही तुमच्या झोळीमध्ये पडत आहे. म्हणून 2014 च्या निवडणूकीत मुद्दाम बघण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी कॉग्रेसला आपण युती करू असे सांगितले व अकोल्यातलीच लोकसभेची जागा आम्ही लढतो आणि उरलेल्या 47 जागंवरती पाठींबा देतो असे कळविले. परंतु 1984 च्या अभद्र युतीच्या कायम राखावी यासाठी कॉग्रेसने प्रस्ताव मान्याच केला नाही तर उलट कॉग्रेसने मुस्लीम उमेदवार देवून पून्हा बीजेपीच कशी निवडून येईल हे पाहिले. आजवर आपण आम्ही तुमची झोळी भरली. आता या पुढे आम्ही तुमची झोळी भरू, अशाच पध्दतीने इमानदार कॉग्रस तुम्हाला गुलाम करता आली आणि तुमच्या उमेदवाराला मोठया प्रमाणत निवडुन आणता आलं, आता तर ‘‘गुलाल पाहिजे की निळ पाहीजे’’  ‘‘मेणबत्ती पाहिजे की पणती पाहिजे’’ असा प्रचार करीत आहात. असा प्रचार करून, कुठल्या जातियतेच्या विरोधात तुम्ही तिर मारताय! तुमच्या नसा नसामध्ये जातीयता ठासुन भरलेली आहे. हीच जातीयता निवडणुकीच्या वेळी उफाळुन येते. निवडणुकीमध्ये बाबासाहेब निवडून आले नाही म्हणुन त्यांचे महत्व काही कमी झाले नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरही मुंबई निवडणुकीत हारले तसेच ते भंडारामध्ये हि हारले. तरीही त्यांचे महत्व कमी झाले नाही. तसे प्रकाश आंबेडकरही निवडणुकीत हारले म्हणुन त्यांचे महत्व कमी झाले असे होत नाही. आजही सत्तेमध्ये नसतानाही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला प्रकाश आंबेडकर समाजसुधारणेच्या प्रश्नावरून सरळ सरळ आव्हान देतात की, शाळेच्या दाखल्यावरची जात काढावी आणि यासाठी लढा उभारणा-या प्रकाश आंबेडकरांची पतंगे यांनी मोठी स्तुती केली आहे. मी असे विचारतो की, संघाच्या प्रचारकांना किंवा मतदारांना तुम्ही आदेश आत्तापर्यंत का दिले नाहीत की शाळेच्या दाखल्यावरती किंवा कुठल्याही अर्जावरती जातीचा उल्लेख करू नये. तुमच्यात ती दानत किंवा हिम्मत नाही, आणि तुमच्या विचारात व तत्वज्ञानात ते बसत नाही. म्हणुन तुम्ही शाळेच्या दाखल्यावरून जात जावी किंवा शाळेच्या दाखल्यावर जात नमुद करू नये असे कधी म्हणत नाही. त्यासाठी मोठं धाडस लागते. आपण याची जाणीव ठेवावी की आपल्या गोस्बल संस्कृतीला कुणी बळी पडणार नाही. जातनिर्मूलनाच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाचा मुद्दा मांडला. हाच मुद्याला पुढे सांगतांना प्रकाश आंबेडकरांनी पुढे जाऊन आपली भुमिका मांडली कि, ज्यांची आंतरजातीय विवाह होतात अशांच्या पुढच्या पिढीला जातीचा उल्लेख असू नये, तो फक्त भारतीय म्हणूनच ओळखला जावा असा कायदा करावा. आज पाच राज्यात भाजपाची व केंद्रातही भाजपाची सत्ता आहे. आपण या भुमिकेशी  सहमत असाल, तर तुम्ही ही हिम्मत दाखवावी आणि हा कायदा करून दाखवावा  परंतु जात नष्ट व्हावी हे तुमच्या आयडॉलोंजीमध्येच बसत नाही. त्यामुळे तुमची हिम्मत होणारच नाही. त्यामुळे मी आव्हानात्मक सांगतो पुढील पाच वर्षे संपेपर्यंत हा कायदा आपण आणणारच नाहीत .

 
पतंगे यांनी लेखामध्ये हिंदु कोडबिलाची चर्चा केली आहे, परंतु हिंदुकोडबील हे सर्वांसाठी नाही, हिंदु कोडबील हे ब्राम्हणशाहीच्या व्यवस्थेमधल्या महिलेच्या शोषणासंदर्भात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त ही सुरूवात असल्याचेही म्हटले, त्यांना संत परंपरा मानणा-या व्यवस्थेमधल्या महिलेचे अधिकार सुध्दा कायद्यामध्ये रूपांतर करावयाचे होते, परंतु या साध्या महिलांच्या अधिकारही आर.एस.एसला पचला नाही त्यांनी दिल्लीतल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढणा-यामध्ये आर.एस.एस होती हे पतंगे यांनी विसरू नये. साधुसंताना एकत्र करून त्या कोडबीलाला नाकरण्याच्या पाठीमागेही आर.एस.एस. होती. मग त्याकाळच्या भुमिकेमध्ये व आजच्या भुमिकेमध्ये काय बदल झाला. काहीच बदल झाला नाही. तो बदल तुम्हाला करूनही घ्यायचा नाही. समान नागरी कायदा व्हावा याची मागणी केली होती, एकेकाळी तुम्हीच त्याचे पुरस्कर्तेही होतात. कॉग्रसवाल्यांना याच प्रश्नावर अडचणीत आणुन कॉग्रेसवाले मुस्लीमांचे लागुंनचालन करतात, म्हणुन आरोप करीत होतात. परंतू आता मुस्लीमांचे सोडा, या देशामधला हिंदु आहेत. त्यामध्ये ओबीसी संतपरंपरातला समुह व आदिवाशी यांचा समावेश आहे, त्यांच्यासाठी तरी समान नागरिक कायदा करा. संतपरंपरेंच्या माणसांना कायदाच नाही, अस्पृश्य गणल्या गेलेल्या वर्गाला कायदा नाही, त्याला एकत्रित बांधण्याच्या दृष्टीने Common Civil Code हिंदुंपुरता तरी मर्यादीत लागु करूया, याच्यावरचीही आर एस एस  ची भुमिका रमेश पतंगे मौनी बाबासारखी आहे. तेव्हा मौन कधी तुटणार आणि हा कायदा लोकसभेत कधी आणणार हे तर स्पष्ट करा! फक्त राजकारणासाठी व लोकांच्या भावना भडकावण्यासाठी Common civil Code  वापर केला असाच आरोप होईल.
    माझ्या माहितीप्रमाणे आर.एस.एस.मध्ये आत्मस्तुतीला जागा नाही. मग रमेश पतंगे हे स्वतःची आत्मस्तुती का करून घेत आहेत की, आर.एस.एसच्या शिबिरांमध्ये माझ्याच पुस्तकांची व लेखांची चर्चा होते, हे कितपत खरं आहे याच्यावरती शंका आहे. माझ्या माहिती प्रमाणे गोळवलकर गुरूजी यांनी  We the Nation and Nation Hood हे पुस्तक व Bunch of thought  हे आर.एस.एस.च्या स्वंयमसेवकाला Gospel  म्हणून मानले जाते. आपण आतातरी लेखामध्ये खोट बोलत आहात. त्या पुस्तकातील शेवटच्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाची विधानं केलेली आहेत. भारत हा प्राचीन देश आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेबांनी असं म्हटल आहे – जर भारत हा प्राचीन देश होता तर त्याचे विघटन का झाले? तो गुलाम का झाला? तर त्याचे खरे कारण होते की, भारत जातीमध्ये विखुरला गेला, आणि जातीमध्ये विखुरल्यामुळे त्याचं अस्तित्वच संपलं आणि म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या देशाला पुन्हा उभं करावं लागेल. गोळवलकरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी शेवटच्या अध्यायात असही म्हटलं की RaceRac  (जात) हीच महत्वाची आहे. आणि ज्या जातीमध्ये बुध्दीमत्ता आहे आणि ज्या जातीमध्ये धन आहे, अशा जातींच्या हातांमध्ये सत्ता असावी आणि प्रतिष्ठा असावी. तिच्याच हातात सत्ता असावी म्हणजे जे शिकलेले व पैसेवाले आहेत, त्यांच्या हातात सत्ता असावी आणि त्यांनीच इतरांवर राज्य करावं. यामुळे रमेश पतंगे तुमच्या पुस्तकाला आर.एस.एस.वाले साधे हुंगतही नाही. तो जो शेवटचा अध्याय आहे. त्यातला काही महत्वाचा भाग मी मुद्दाम यामध्ये तुमच्या माहीतीसाठी नमुद करीत आहेत. विद्वान असला तर तो भाग काय आहे हे समजून घ्या.
   We the Nation and Nation Hood या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात पान नं.47  वर स्पष्ट लिहीलं आहे. “If they do not do so, they live merely as outsiders, bound by all the codes and conventions of the Nation, at the sufferance of the Nation and deserving of no special protection, far less any privilege or rights, There are only two courses open to the foreieg elements, either to merge themselves in the national race and adopt its culture, or to live at its mercy so long as the national race may allow them to do so and to quit the country at the sweet will of the national race. That is the only sound view on the minorities problem. That is the only logical and correct solution. That alone keeps the national life healthy and undisturbed. That aloe keeps the Nation safe form the danger of a cancer developing into its body politic of the creation of a stats within the state”. हेच सध्या आर.एस.एस.च्या शिबिरांतून शिकविले जाते. आजही आर.एस.एस. गोळवलकरांनाच आदर्श व मार्गदर्शक मानते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना उत्तर देतांना किंवा त्यांच्याबद्दल लिहितांना स्वतःला गोळवलकर समजू नका, तेव्हा गोळवलकरांच्या पुस्तकातील लेखाप्रमाणे अधिकार आणि प्रतिष्ठा या जातीत कैद केलेली आहे. इतर जातींना प्रतिष्ठा  आणि सत्ता यांच्यापासून वंचित केले आहे. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही पुन्हा नव्याने ‘जातीवाद’ तथा ‘मनुवाद’ आणत आहात. ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इथली सत्ता सर्वसामान्यांची असली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त राजकिय सत्तेच सार्वत्रिकिकरण  म्हणून महत्वाचे होत, त्या बरोबर त्यांना सामाजीक आणि आर्थिक सत्ता याचे हि सार्वत्रिककरण महत्वाचे होते. सामाजीक सार्वत्रिक करणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुजारी फक्त एकाच जातीचा असू नये, तर पुजारी पदाचेही सार्वत्रिकिकरण झाले पाहिजे. या वरून सर्व जाती धर्माचे यात पुजारी असले पाहिजेत. परंतु याबद्दल आर.एस.एस. वाले मौन बाळगतात स्पष्ट  बोलत नाही, त्यांना हे माहित आहे की स्पष्ट  बोलले की त्यांचे  खरं रूप बाहेर येईल. म्हणून मी आपल्याला पुन्हा सल्ला देतो की प्रकाश  आंबेडकर यांचे भाषण पुन्हा वाचा व बारकाईने ऐका… म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल, मग कळेल की प्रकाश आंबेडकर हिसेंची भाषा बोलले नाहीत. उलट आर.एस.एस.वाले काय कृती करतात व त्या कृतीतून काय घडू शकते यावर भाष्य केलं, लोकशाहीमध्ये हुकूमशाही घुसवण्याचा जो तुमचा खटाटोप चाललाल तो हाच की, ‘ भारत माता की जय’ म्हणाच या कृतीतून दिसून येत आहे. अशी जबरदस्ती करणे ही हुकूमशाही नाही तर काय आहे…? इथे माणसांनी काय खावं हे ही तुम्हीच ठरवावं ही हुकूमशाही नाहीतर काय? प्रकाश आंबेडकरांनी फक्त एवढंच म्हटलं की लोकशाहीतला शहाणपणा तुमच्याकडे असू द्या, निवडणुका या 2019 लाच होऊ द्या, जर ती एखादयावेळेस वर्षभर पुढे ढकलली तर जिथे तरूणपिढी (जी आई-बापाचं ऐकत नाही) ती तुमची काय ऐकणार आहे आणि म्हणून जी तरूणपिढी तुम्ही कैद करायला निघालात तीच तरूणपिढी तुम्हाला सोडणार नाही. हा दिलेला इशारा किंवा सांगितलेलं शहाणपण हे हिंसक कसं होऊ शकतं ?  एवढंच काय पण मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी आर.एस.एस.वाल्यांना हेच विचारलं होतं की विजयादशमीच्या (दसरा) दिवशी तुम्ही शस्त्रांची पुजा का करतात, परंतू याचं उत्तर संघाने अजून दिलेले नाही. संघ ही काय पोलिस किंवा मिलिट्री नाही, संघाला शस्त्र लागतातच कशासाठी…? शस्त्र बाळगणारी संघटनाच हिंसक असते हे पतंगे तुम्ही हि पाहिल्यांदा लक्षात घ्या. रमेश पतंगे तुम्ही असं समजू नका लोकांना काही समजत नाही, लोकांना सर्वकाही समजतं, लोकं लक्षात ठेवतात आणि योग्यवेळी त्यांचे बरोबर उत्तर देतात. त्यामुळे एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये शस्त्राची नव्हे तर संवादाची आणि खुली चर्चा करा निर्णय लोकांना घेऊ द्या, कारण लोकशाहीत निर्णय लोकांनाच घ्यायचा असतो. आपापली खुली भूमिका फक्त लोकांसमोर मांडायची असते, परंतू तेही तुम्हाला मान्य नाही, आणखी एक सांगु इच्छितो की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘धम्मदिक्षेसाठी नागपूर ही भुमी निवडतांना ही नागांची अर्थात नागलोकांची भुमी आहे म्हणून मी जागा निवडतो आहे असं स्पष्ट डॉ. बाबासाहेबांनी सांगितलं होत, तरीही आर.एस.एस. वाल्यांनी खोटा प्रचार केला की बाबासाहेबांनी संघाला आव्हान म्हणून ही भूमी निवडली, बाबासाहेबांनी तर असं एकदाही म्हटलं नव्हत की मी संघाला आव्हान देण्यासाठी ही भुमी निवडली आहे. मग हा खोटा प्रचार कशासाठी…? प्रकाश आंबेडकरांनी स्वच्छ दृष्टी ठेवली पाहिजे असं पतंगेच्या लेखात लिहितात, परंतू तुमच्या मते स्वच्छ-अस्वच्छ म्हणजे काय हेच समजत नाही, कारण प्रकाश  आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांमध्ये अस्वच्छ दृष्टी कोणती हे तर स्पष्ट करा, परंतू ते करणार नाही, कारण शब्द छल करणं हा आर.एस.एस. चा जुना खेळ आहे. बोगसनितीवरती जशी  आर.एस.एस.ची मास्टरकी केलेली आहे, अशी शब्द छलांवरती सुध्दा मास्टरकी केली आहे. त्यामुळे ते स्पष्ट बोलत नाही. याच लेखात रमेश पतंगे म्हणतात स्त्रि-पुरूषांतील समानता संघाला मान्य आहे. परंतू विडंबनेचा सुध्दा कळस असतो, पतंगे (ते) एका हातात मनुस्मृती घेउन चालते आणि दुस-या हातात स्त्रि-पुरूष समानता सांगणारे संविधान याला नाकारतात जे संविधान स्त्रि-पुरूष समानता मानते व ती स्विकारते त्याच संविधानाला तुम्ही नाकारता, पतंगे तुम्ही असं स्वतःला किती दिवस फसवणार आहात आणि किती दिवस धर्माच्या नावाखाली लोकांना फसवत राहाणार आहात. म्हणून पहिल्यांदा हिंदुना आवाहन करतो की संघाला पहिल्यांदा हे विचारा की, हिंदूना एकत्र आणण्यासाठी आर.एस.एस. कडे अजेंडा काय आहे? संघाचा एवढाच अजेंडा आहे की, मुस्लीमांना विरोधक करून हिंदूच्या भावना भडकवणं. हाच अजेंडा आहे या उलट प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला अजेंडा हा हिंदूना एकत्र आणण्याचा अजेंडा आहे. हिंदूमधला असलेला अधिकार हा ब्राम्हण्य व्यवस्थेमध्ये आहे आणि हा अधिकार ब्राम्हण्य व्यवस्थेमध्ये न राहता तो संत परंपरेमध्ये सांगितल्याप्रमाणे तो सर्व हिंदूपर्यंत गेला पाहिजे असा आहे. म्हणून रमेश पतंगेना पुन्हा एकदा आव्हान आहे की, हिंदूना एकत्र आणण्याचा अजेंडा एकदा सांगाच…अन अजेंडा नसेल तर मान्य करा की आर.एस.एस. कडे असा अजेंडा नाही. 
    असे म्हाणणारे नाही की, तुमच्याकडे अजेंडा नाही, तुमच्याकडे अजेंडा आहे तो फक्त इथली सत्ता ब्राम्हण्यशाहीच्या हातात कशी राहील आणि यासाठी म्हणून तुम्ही इतर हिंदूचा वापर करीत आहात. आर.एस.एस इतर हिंदुसाठी मुसलमानांचा 600 वर्षाचा इतिहास भितीचा हत्यार म्हणून वापरत आहेत. जस मुसलमानाने राज्य केल तसच ब्रिटीषांनी राज्य केले. 21 व्या शतकामध्ये इंटरनेटच्या माध्यामातून सर्व प्रकारचे माहितीचे explotion होत आहे. खरं तर रमेश पतंगे यांना विनंती आहे की त्यांनी नसिरूददीन शहा यांचा अ वेनस-डे (A Wednesday) सिनेमा बघावा. एका माणसाने (नसिरूददीन शहा) संपूर्ण पोलिसांना व संपूर्ण यंत्रणेला बोटावरती नाचवलं अन बोटावर नाचवल्यानंतर त्यांनी (नसिरूददीन शहा) सांगितले की हे सगळं साहित्य इंटरनेटवर मिळत आणि ते मी इंटरनेटवरूनच घेतलेलं आहे. तुमची जी हिंदूत्वाची (ब्राम्हणी) संकल्पना आहे किंवा हिंदूराष्ट्राची जी संकल्पना आहे, मग त्यामध्ये ओबीसी, आदिवासी, शुद्र, अतीशुद्र, शीख, बौध्द, जैन, ख्रिचन, मुसलमान यांना तुम्ही विदेशी म्हणून ठरवलं आहे. इथे कोण विदेशी कोण स्वदेशी  ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी ? टिळकांनीही मानत नाहीत यांच एकमेव कारण की त्यानी आर्यांना विदेशी म्हटलं होतं, त्यानी असं म्हटलं होतं की आर्य बाहेरून आले त्यानी इथे येउन हल्ले केले व आपली एक वसाहत निर्माण केली. आम्हाला हे सांर समजत, परंतू आम्ही काही बोलत नाही. पण जर तुम्ही आम्हाला बोलण्यास भाग पाडत असाल तर आम्ही तुमचं सारं पितळ उघड करू. टिळकांशी काय मतभेद आहे हे एकदा स्पष्ट  करा हे तुम्ही करू शकणार नाही, त्यामुळे नको त्या विषयांमध्ये हात घालायला लावू नका. आजच्या या सर्व परिस्थितीमध्ये पुन्हा एक आव्हान करतो की ज्या ओबीसी, आदिवासी शुद्र, अतीशुद्र, शीख, बौध्द, जैन, ख्रिचन, मुसलमांना विदेशी म्हणता मग या लोकांचं काय करणार आहात हे स्पष्ट करा. या भौगोलिक भागाची मालकी तुमच्याकडे दिली तरी कुणी? लोक शांत आहेत सध्या काहीच बोलत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांचा मुकपाठिंबा आहे, हीच लोकं जर अशांत झाली तर देशाचं वातावरण अशांत होईल, म्हणून निर्वाणीचा सल्ला देतो की 12 व्या शतकातून बाहेर पडा आणि 21 व्या षतकात या, नाहीतर आपल्या स्वार्थासाठी ते चांगले ते असणार नाही. हे मला मान्य आहे की, इथली राजकीय परिस्थिती आपल्याशी मुकाबला करू शकणार नाही, कारण चारित्र्याचं आणि विचारांचं नेतृत्व कॉंग्रेसकडून येत नाही म्हणून कॉंग्रेज हे घराणेशाहीचं राजकारण करतंय अशी टीका होतेय, वस्तुस्थिती आहे की सन्माननिय सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे दोघही आपला इतरांशी सामना करू शकत नाही. परंतू ज्या दिवशी सन्माननिय सोनिया किंवा राहुल गांधी ऐवजी नवीन अध्यक्ष निवडला जाईल त्या दिवशी कॉंग्रेस नव्या जोमाने उभी राहील. तीच अवस्था कम्युनिष्टांची आहे, कम्युनिष्टांनी आर्थिक आर्थिक करून जातीच्या व धार्मिक सामाजिक, प्रश्नाकडे  दुर्लक्ष केलं, आज तेच दुर्लक्षित होण्याच्या मार्गावर आहे. उद्या जर का त्यांनी बदल केला आणि त्यांची नाळ सामाजिक व धार्मिक प्रश्नांना जोडली तर तेच तुम्हाला विचारतील की या देशा तील भांडवलदारावरती तुमचा विश्वास का नाही. सगळी क्षेत्र परदेशी भांडवलदारांसाठी का खुली करत आहात, याचं कारण काय…? परदेशी भांडवलदार आला की अधिकार जातो, तुमच्या मनात हे तर नाही ना की, परदेशी  भांडवलदार जसा मागे आला, त्यांच्याबरोबर एक समझोता केला, तुम्ही राजेशाही चालवा अन आमच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करू नका, तेच तर मोगलांनी आणि ब्रिटीशांनी केलं, आता ती व्यवस्था Multinational कंपन्यांना आणून देशाला लुटायला लावत आहात आणि सांगत आहात की आमच्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेत हस्तक्षेप करायचा नाही. आमचं वर्चस्व तू मान्य कर… हीच नव्याने तुम्ही या देशात गुलामी आणत आहात. रमेश पतंगे आम्ही हे लक्ष ठेवून आहोत की दिनांक 05/एप्रिल/2016 तरूण भारताच्या मुंबई आवृत्ती अग्रलेखाच्या खाली आपण लेख लिहला आहे .

प्रवीण जाधव,
प्रमुख ,
भारिप माहिती तंत्रज्ञान व माहिती विभाग. apsinfotechpvt.ltd@gmail.com

दैनिक दिव्यमराठी मध्ये रमेश पतंगे यांचा ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ हा लेख १५ एप्रिलच्या आवृत्ती मध्ये पृ.क्र. ६ वर छापून आला होता.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/15042016/0/1/

दैनिक दिव्यमराठी मध्ये प्रवीण जाधव यांनि लिहिलेला लेख (महत्वाचा मजकूर वगळून ) २९ एप्रिलच्या अकोला आवृत्ती मध्ये पृ.क्र. ७ वर छापून आला होता.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/akola/354/29042016/0/1/

2 thoughts on “डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का !

  1. जातीअंताच्या लढाईसाठी बहुजनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा कारण जातीयवादी व्यवस्था आपली लढाई विशीष्ट जातीपुरती सिमीत असल्याबाबत विषारी प्रचार करते मनुवादी विचारसरणीला बळी पडते हे या देशाचे मोठं दुदैव ! परंतू लढाईत सातत्य ठेवावं लागेल येनार्या पिढीला कारणी लागेल

    Like

Leave a comment