डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गांधिजि, पंडित नेहरु, सरदार पटेल आणि संपुर्ण काॅंग्रेस सोबत असलेले वितुष्ट लक्षात घेतल्यास काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारताची घटना लिहिण्याचे कार्य का सोपविले याबद्दलचा खरा ईतिहास अनेकांना माहिति नाहि. काॅंग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे  ‘भारताचे संविधान एका अस्पृष्याच्या हातुन लिहिले जावे’ अशि गांधिजिंचि इच्छा होति म्हणुन काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे संविधान लिहिण्याचे कार्य सोपविले…