दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल !

PSX_20160701_100543

दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही खोटे आरोप केले आहेत. पण स्वतःला ट्रस्टी म्हणविणारी ही चांडाळ चौकडी खरोखर ट्रस्टी आहेत का ?  रत्नाकर गायकवाड आणि कंपू ट्रस्ट बद्दल जे दावे करत आहेत ते खरे आहेत की खोटे? याचाही शोध आपण घेतला पाहिजे.

२००४ सालि प्रा.आसवारे हे पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टचे सचिव असतांना ट्रस्टच्या घटनेत बदल करुन ट्रस्टिंचे निवृत्तिचे नियम ठरविण्यात आले होते. या नियमांनुसार ट्रस्टवर असलेल्या व्यक्तिने वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले असतील तर त्या व्यक्तिस ट्रस्टवरुन सेवानिवृत्त करण्यात येते. पण या नियमासोबत एक नियम अजुन आहे ज्यानुसार ट्रस्टवर  असलेलि व्यक्ति ७५ वर्ष वयाचि असेल आणि शारिरिक दृष्ट्या ट्रस्टचे काम करण्यास सुदृढ असेल तर त्या व्यक्तिस निवृत्त न करता पुढचे पाच वर्ष ट्रस्टवरच राहु द्यावे. प्रा.आसवारे यांचे वय ७५ झाले असतांनाहि ते सुदृढ होते त्यामुळे त्यांना पुढचि पाच वर्षे ट्रस्टवर ठेवणे हे ट्रस्टच्या घटनेनुसार बंधनकारक होते. पण रत्नाकर गायकवाड या व्यक्तिने ईतर ट्रस्टिंना हाताशि धरुन प्रा.आसवारे यांना बेकायदेशिरपणे ट्रस्ट बाहेर केल्याचे खोटे पुरावे सादर केले आहेत. तोतया ट्रस्टिंनि यासंबंधिचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे पण हा रिपोर्ट अजुन मान्य झालेला नाहि. कायदेशिरपणे आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातिल कागदपत्रांवर प्रा.आसवारे हेच ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. प्रा.आसवारे यांनि या तोतया कंपु विरोधात धर्मदाय आयुक्ताजवळ कंम्प्लेंट सुध्दा नोदविलेलि आहे.

प्रा.आसवारे यांना वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यावर नियमांच्या विरुद्ध जाऊन ट्रस्ट बाहेर करण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर लगेच रत्नाकर गायकवाडने आणि त्याच्या कंपूने मागच्या ३०-३५ वर्षांपासुन कॅनडा मधे स्थायिक असलेल्या ७४ वर्षीय योगेश वराडे या NRI व्यक्तिला बेकायदेशिरपणे छल करुन पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टवर घेतले आहे. ७५ वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रा.आसवारे यांना काढले आणि ७४ वर्षे वय पूर्ण असलेल्या वराडे या व्यक्तीस बेकायदेशीर पणे ट्रस्टवर घेतले. योगेश वराडे आज ७६-७७ वर्षांचे झाले आहेत पण त्यांना अजूनही सेवानिवृत्त करण्यात आलेले नाही. NRI असलेल्या व्यक्तिस ट्रस्टवर घेण्यासंबंधीची कोणतीही तरतूद ट्रस्टच्या घटनेत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ३० वर्षांपासून भारताबाहेर असलेल्या योगेश वराडे याचा आंबेडकरि समुदायाशि दुर पर्यंत कुठलाहि संबंध नाहि.

रत्नाकर गायकवाड शासकीय अधिकारी असतांना स्वतः या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून आला. पण शासकीय अधिकारी अश्या कुठल्याही ट्रस्टवर राहू शकत नाही म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात ज्या व्यक्तीने ट्रस्टला पैसे दान केले होते, त्या व्यक्तीच्या पुत्राने RTI कायद्याखाली अर्ज टाकून गायकवाडच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर गायकवाडच्या मागे चौकशी लागली होती . या प्रकरणात आणि इतर प्रकरणात अडकलेल्या रत्नाकर गायकवाड ने ट्रस्ट मधून राजीनामा दिला होता. रत्नाकर गायकवाडने ने राजीनामा दिल्यानंतर ट्रस्ट आपल्या बापजाद्याची प्रॉपर्टी असल्या प्रमाणे त्याचा मेहुणा असलेल्या विजय रणपिसे याला ट्रस्ट मध्ये सामील केले आणि स्वतःला ट्रस्टचा सल्लागार म्हणून घोषित केले. ट्रस्टमध्ये सल्लागार अश्या कोणत्याच पदाच्या नेमणुकीची व्यवस्था नाही त्यामुळे रत्नाकर गायकवाडची सल्लागार म्हणून असलेली नेमणूकही बेकायदेशीर आहे. ट्रस्टवर घेण्यात आलेला विजय रणपिसे हा मुंबईतील लोढा बिल्डर कडे काम करतो. मुंबई मध्ये बेकायदेशीर पणे जागा लाटण्यात लोढा बिल्डर पटाईत आहे. विजय रणपिसे याचा सुद्धा चळवळीशी दूर पर्यंत कुठलाही संबंध नाही. उलट संस्था स्थापन करून लोकांकडून देणग्या गोळा करणे आणि सरकारी अनुदान लाटणे हे विजय रणपिसे या व्यक्तीचे धंधे आहेत.

रत्नाकर गायकवाड आणि कंपू , जे स्वतःला ट्रस्टी म्हणून सांगतात त्या पैकी श्रीकांत गवारे नावाचा व्यक्ती जो सचिव आहे तो एकच ट्रस्टी खरा आहे उरलेले सर्व बेकायदेशीर आहेत आणि यांच्या या बेकायदेशीर ट्रस्ट कार्यकारिणीला  धर्मदाय आयुक्त कार्यालयातूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रा.आसवारे हेच या ट्रस्टचे खरे अध्यक्ष आहेत.

रत्नाकर गायकवाड आणि कंपू हा दावा सुद्धा करतायत की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता नसून ट्रस्टची मालमत्ता आहे. हा दावा करतांना ते एक पत्र दाखवत आहेत. जेष्ठ आंबेडकरी नेते ज.वि. पवार यांनी ते पत्र खोटं असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मुंबई कोर्ट सूट क्र. ४९२०  १९५४ मध्ये ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही ट्रस्टची मालमत्ता नाही.प्रेस माझी वैयक्तिक मालमत्ता आहे.’ असे लिहून दिलेले आहे. ज्यावरून हे सिद्ध होते की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता आहे. रत्नाकर गायकवाड ने ५०० गुंड सोबत घेऊन आंबेडकर परिवाराच्या वैयक्तिक मालमत्तेस तोडले आहे.

रत्नाकर गायकवाडने आंबेडकर भवन बद्दल एक दावा अजून केला आहे की आंबेडकर भवन हे फक्त मंगलकार्य आहे आणि आंबेडकर बंधूंनी त्याला गुंडांचा अड्डा बनविले आहे. रत्नाकर गायकवाडचा हा दावा शुद्ध खोटा आहे कारण आंबेडकर भवन हे रिडल्स आंदोलना वेळी , रमाबाई नगर हत्याकांड प्रकरणी , खैरलांजी प्रकरणी आणि आताच झालेल्या रोहित वेमुला आंदोलनाचे केंद्रस्थान राहिलेले आहे. रोहित वेमुलाच्या आई आणि भावाने काही दिवसांच्या आधी इथेच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. मुंबईतील सर्वच आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय संघटना आपल्या मिटींग्स आणि आपले कार्यक्रम इथेच विनामूल्य आयोजित करतात. मुंबईतील प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यासाठी सदैव उपलब्ध असलेले हे एकमेव ठिकाण आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी मुंबई येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना रात्री कुठेच आसरा नाही मिळाला तर ते सरळ आंबेडकर भवन गाठतात. त्यामुळे रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवन बद्दल करत असलेला दावा अत्यंत खोटाच नाही तर आंबेडकरी चळवळीचे अपमान करणारा आहे.

शासकीय अधिकारी असतांना सुद्धा बेकायदेशीर पणे आंबेडकर कुटुंबाची वैयक्तिक प्रॉपर्टी आणि आंबेडकर भवन पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नाकर गायकवाड याला त्वरित शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि या तोतया ट्रस्टींनि बेकायदेशीर पणे आंबेडकर भवन आणि आंबेडकर कुटुंबाच्या मालकीची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडल्यामुळे या सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी.

जयभीम,
सुमित वासनिक.

sumit.wasnik@outlook.com

 

Advertisements

3 thoughts on “दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल !

  1. मला माहीती पाठवत जा बाबासाहेबांंन व चळवळी विषयी.

    Like

  2. Yad rakha gaiwad tumhi je kartya na he tumala khup khup bhari Padel…babasaheb naste na tumhi amhi nasto….

    Like

  3. If he is govt servent how he can come on television and behaved like political person If he is not trusty of PITrust then how he can say that yes we demolished the strcture and the person who is occupying the chair of quasi judicial post like CIC of state how he comes before the media this all is folishness on his part and nothing but he want to grab the property of peaple which is till preserved by tbe loyal ambedkarian so all this show seems to be goes aginst Ratnakar

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s